Wednesday, November 18, 2009

स्वातंत्र्य तुमच्या बापाचे आहे का?

स्वातंत्र्याच्या 63 व्या वर्षात सर्वसामान्य जनता खरंच स्वतंत्र आहे का? अस्वस्थ झालेली भिरभिरत्या नजरेची अनेक तरूण मुले, कसे बसे उरलेले आयुष्याचे दिवस काढत राहिलेले वयोवृद्ध मुलाबाळांना जन्म देऊन त्यांचे संगोपन व जगण्याची व्यवस्था करण्यासाठी बिर्हा ड बांधून इतरत्र कामावर जाणारा मजूर, काखेत हिरो बॅग घालून जाणारा रेतीवाला कामगार यांच्या संपूर्ण आयुष्यात स्वातंत्र्य आहे का? पशु पक्ष्यांनी पिलांना जन्म द्यावा त्याप्रमाणे मुलांना जन्म देऊन बायकोला त्यांचा सांभाळ करण्यासाठी गावात ठेवायचे व घरातील सर्वांना दोन वेळेचे कसे बसे अन्न मिळावे म्हणून कर्त्या पुरुषाने इतरत्र मिळेल तिकडे दिवसेंदिवस बाहेर मोलमजूरी करावयाची हेच का ते स्वातंत्र्य?

स्वतंत्र भारताच्या पूर्वर्धापासून आजपर्यंत अनेक विकासाच्या योजनांचे कागदी घोडे कधी संसदेत कर कधी विधान सभेत नाचविले, कधी दिल्लीत तर कधी मुंबईत विकासाच्या मोठमोठ्या योजना कागदावर उतरविल्या. आजच्या परीस्थितीत अण्णांच्या कठोर प्रयत्नांनी, आबा सारख्या कर्त्या पुरुषाच्या पुढाकारानी दिल्लीतील विकास योजना गल्लीत आल्या (ग्रामपंचायत) पण त्या फक्त कागदावर. विषेश म्हणजे आदिवासींचे अर्थात सर्वांच्या विकासासाठी दिल्लीपासून गल्ली पर्यंत शासकीय नोकरांची व पदाधिकार्यांआची कार्यपद्धती अमलात आहे. त्याप्रमाणे कागदावरील कारभार रक्तरंजित करून रंगवून सरकारच्या जाहिरनाम्याप्रमाणे फाइली भरल्या आहेत. परंतु गोदामात साठवून ठेवलेल्या धान्याचा उपयोग काय? ते धान्य वाटून देणार्याप एका प्रेमळ बापाची गरज असते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर एक नवे तर दोन बापांची कार्यपद्धती विकसित आहे. आमचे मात्र दुर्दैव आहे की जन्म देणार्याक बापाला अक्कल कमी तर सावत्र बापाची माया कमी. आज आदिवासी विकासासाठी स्वतंत्र विभाग, खाती, स्वतंत्र मंत्री, सचिवालय आहेत. वेगवेगळ्या कार्यालयात वेगवेगळे आदिवासी विकासाच्या योजना आहेत. पण स्वातंत्र्याच्या 63 व्या वर्षानंतर सुद्धा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो, ‘स्वातंत्र्य कुणाच्या बापाचे?’ एखादी विकासाची योजना वैयक्तित, सामाजिक घ्यावयाची असेल, तर पदाधिकार्यांतच्यी, शासकीय अधिकार्यावची शिफारस तसेच योजना एक कागदे अनेक या विविधतेत दुसरी भर म्हणजे आमच्या आदिवासी समाजात प्रत्येक सणाला मावली, चेडा, वाघ्यादेव, गावदेव, बारस यांना सगळ्यांना टिळे द्यावे लावतात. किंबहुना प्रत्येक पोळ्याला सर्व देवांना चौरे बांधावी लागतात. तसेच प्रत्येक टेबलावरील देवाला नमस्कार, चमत्कार, रामराम घालून पुंजावे लागते. त्याला पर्याय नाही. विषेश म्हणजे साधे अर्ज घेण्यासाठी टाळाटाळ करून कायदे अटी दाखवणारे पैशे दिल्यानंतर काम करतात. तेव्हा प्रश्न निर्माण होतो... ‘स्वातंत्र तुमच्या बापाचे आहे का?’


वास्तविक कायद्याप्रमाणे खुर्चीवर विराजमान होणारे पदाधिकारी जनतेचे सेवक आहेत. दुसर्‍या खुर्चीवर बसणारे शासकीय कर्मचारी जनतेचे नोकर आहेत (दोन बाप). परंतु स्वातंत्र्याच्या 63 वर्षानंतर सुद्धा पुढा-‍यांची (सेवकांची) हुकुमशाही, नोकरांची ब्रिटिशशाही या विकासाच्या आड येणार्यार सर्वात मोठी न उलगडणारी समस्या समाजात पाय रोवून उभी आहे. म्हणून या समस्यांना उत्तेजन देणार्याम महाभागांना माझा प्रश्न ‘लोकशाहीच्या राज्यात मिळालेले स्वातंत्र्य तुमच्या बापाचे आहे का?’ मनात मानत असाल ‘हो’ तर ती घोड चूक करू नका. कारण कवी गोविंद यांच्या

रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना
असा भूतकाळीन सिद्धांत जाणा
स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले
रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले?

 
या ओळी अत्यंत समर्पक आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या प्रयत्नात अनेक तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. क्रांतीच्या वेशीवर आपली शरीरे समिधा म्हणून अर्पण केली. या सर्वांची आठवण न ठेवणे म्हणजे कृतघ्नता होय. धर्म शास्त्रात सर्व प्रकारच्या पापांना प्रायश्चित आहे. तथापी कृतघ्नता या महात्पापाला मात्र कोणतेही प्रायश्चित नाही. असो.

परंतु आता मात्र बाप हुशार झालेत त्यांनी चारून बघितले व आपल्याला मोठे केले. आता म्हणतात तुम्हीच खा आम्ही वाढून दिले आहे. आता किती खायचे ते तुम्ही ठरवा. म्हणजेच शासनाने योजनांचे कायद्यात रुपांतर करून ते आपल्या हातात दिले आहेत.


1. रोजगार हमी योजना –> राष्ट्रिय ग्रामिण रोजगार हमी अधिनियम 2005 अंतर्गत
2. अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियम 2006 आणि नियम 2008
3. रोमाहितीचा अधिकार अधिनियम 2005

कायदे झाले म्हणजे विकास दारात आला या भ्रमात राहू नका. कारण जसे स्वातंत्र्य म्हणजे एकदा घडणारी घटना नव्हे, नेत्यांच्या जयंत्या बयंत्या होतात तशी स्वातंत्र्याची ही एक जयंती केली की स्वातंत्र्य टिकते असे नाही. स्वातंत्र्य हे एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जसे देहातले चैयन्य असते. मिळाले एकदाचे स्वातंत्र्य असे म्हणून जांभई देता येत नाही. राज्याभिषेक झाला म्हणून शिवरायांनी तलवार म्यान केली असती तर स्वराज्य केव्हाच बुडाले असते. मावळे जागते होते म्हणून स्वातंत्र्य टिकले. आता आम्ही शिवजयंती ला मावळ्यांची सोंगे आणतो पण स्वातंत्र्याची जागते म्हणून स्वातंत्र्याचा बाणा काही आम्ही जगत नाही. मुर्दाडासारखे बसून आम्ही स्वातंत्र्य हरपताना बघतो. छ्त्रपालापासून भगतसिंघापर्यंत अनेकांनी स्वातंत्र्याची प्रेरणा शिवाजी महाराजांकडून घेतली. पण आम्ही येथे शिवरायांच्या भूमित जन्मूनही स्वातंत्र्याची राखण करायला उठत नाही. त्याचप्रमाणे कायद्याची अम्मलबजावणी करण्यासाठी आपण थोडेफार कष्ट करण्याची आवश्यकता आहे. जसे स्वातंत्र्यासाठी तंट्या भिल, बिरसामुंडा, नाग्या कातकरी अनंत कान्हेरे, मदनलाल धिंग्रा व स्वातंत्र्यवीर सावरकर यासारख्या क्रांतीविरांनी प्राणांची आहुती देऊनच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. विषेश म्हणजे इंग्लंडच्या भूमीवर एका गोर्याआचे रक्त सांडण्याचा भीष्म पराक्रम मदनलाल धिंग्राने केला. तेव्हा क्रांतीवीरही हिंदुस्तानातच नव्हे तर थेट ब्रिटन मध्ये येऊन एका गोर्यााला लोळवतात हे क्रांतीवीरानी केलेले प्रेरेणादायी सत्य आहे. म्हणून या स्वातंत्र्यात आपण आपल्याबरोबर समाजाचा विकास करण्यासाठी अस्तित्त्वात अलेल्या कायद्यांची अम्मलबजावणी करण्यासाठी सामाजिक बांधिलकीने सहभागी व्हा. मी म्हणणार नाही क्रांतीकारक व्हा, प्राणांची आहुती द्या परंतु एक मात्र नक्की... आपण कुठेतरी दूरवरचे नाव ऐकतो अण्णा हजारे, पोपोटराव पवार, चैतराम पवार यासारखे कर्तव्यबहाद्दुर समाजसेवक मात्र निश्चित होऊ शकतो. तेव्हाच आपणाला कोणी विचारेल ‘स्वातंत्र्य तुझ्या बापाचे आहे का?’ तर मग तयार व्हा ‘हो’ म्हणायला. शिका कायदे आणि म्हणा ‘हो, स्वातंत्र्य आमच्या बापाचे आहे’

-विनायक थाळकर

No comments:

Post a Comment